Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 07 April 2025 | ABP Majha | Maharashtra News
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांचं वर्चस्व, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का.
महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्ते आज बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेणार, जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी भेट
गोखले इन्स्टीट्युटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी, गोखले इन्स्टिट्युटची १ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी देशमुख यांना अटक.
भारत सेवक समाज संस्थेकडून आपलीच घोडचूक अखेर दुरुस्त, संजीव संन्याल यांची गोखले इन्स्टिट्युटच्या कुलपतीपदी पुन्हा नियुक्ती, सचिव मिलिंद देशमुखांवर कारवाई करायचं सोडून संन्यालांना हटवलं,गैरसमजातून संन्याल यांना हटवले' अशी संस्थेकडून कबुली.
सोलापूरातील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आज येणार, जगजीवनराम झोपडपट्टीत दोन मुलींच्या मृत्युनंतर पालिकेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
विदर्भात तापमानाचा पारा ४३ अंशावर, अकोल्यात सर्वाधिक ४३.२ अंश से. तापमानाची नोंद, तर ब्रह्मपुरीत ४२.९, अमरावतीत ४२.६, नागपुरात ४२.२ अंश से. तापमानाची नोंद.